प्रस्तावना

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)

         ।। श्री स्वामी समर्थ।। दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गाच्यावतीने श्री क्षेत्र दिंडोरी व श्री गुरुपीठ त्र्यम्बकेश्वर येथून देशभरात समस्त मानव जातीच्या हितार्थ राबविल्या जाणाऱ्या नागरी आणि ग्राम अभियानान्तर्गत "स्वयंरोजगार विभाग" हा अतिशय महत्वाचा आहे. ब्र.भू. तेजोनिधि सद-गुरु मोरेदादांनी पन्नास वर्षापुर्वी या कार्याची मुहूर्तमेढ् रोवली व त्यानंतर गेली अनेक वर्षे सातत्याने या १२-सूत्री ग्राम अभियानाच्या माध्यमातून समाजातील आर्थिक तसेच दुर्बल अशा सर्व घटकांना एकत्र आणून त्यांना स्वावलंबी व सक्षम बनविण्याचा प्रयत्न हा सेवामार्ग करीत आहे...
उपक्रम
परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शन व आशिर्वादाने खापरावरील मांडे बनवण्याचे मोफत प्रशिक्षण व विक्री चे नियोजन केलेले असून श्री स्वामी समर्थ मंत्र संस्कार बरोबरच सात्विक,स्वच्छ पद्धतीचा वापर केलेले मांडे प्रशिक्षणाचा लाभ सर्व भाविक व सेवेकरींनी घ्यावा. विशेष सूचना:- ज्या सेवेकरी/भाविकांना प्रशिक्षणास येयचं आहे त्यांनी त्वरित फोन करून सांगावे.

Guid1
स्वयंरोजगार विभागकडून नुकताच श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र, गाडीतळ, हडपसर, पुणे येथे प्रशिक्षण/शिबीर संपन्न झाले, यामध्ये मुलाखतीला कसे सामोरे जावे? तसेच Interview soft skill या विषयावर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.

Guid1
स्वयंरोजगार विभागातून श्री स्वामी समर्थ नगर सेवा केंद्र, आचोळे तलाव, अचोळे रोड,नालासोपारा पूर्व,पालघर येथे दि. २०/०३/२०१६ रोजी आळंबी(मशरूम) या विषयावर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते.
वृत्त विशेष / जाहिराती
अनुभूतीच्या प्रकाशवाटा...!